Home क्राईम पैशांवरून तरूणाला दोघांकडून मारहाण व जीवे मारण्याची धमकी !

पैशांवरून तरूणाला दोघांकडून मारहाण व जीवे मारण्याची धमकी !


जळगाव लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील फुले मार्केट येथे पैसे देण्या घेण्यावरून एका तरूणाला शिवीगाळ व मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, नितीन सुभाष गोरे वय २५ रा. जळगाव हा तरूण शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शहरातील फुले मार्केट परिसरात असतांना नसरिन अंसार शेख आणि हुजेफ अंसार शेख दोन्ही रा. पाचोरा यांनी पैसे देण्या घेण्यावरून नितीन गोरे याच्याशी वाद घातला नंतर मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर नितीन गोरे याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ इंदल जाधव हे करीत आहे.


Protected Content

Play sound