Home क्राईम दहा लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

दहा लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

0
115


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी कन्नड येथे १० लाखाची मागणी व घटस्फोट देण्याची धमकी देवून छळ केल्याचा प्रकार समोर आला आह.े याप्रकरणी शनिवारी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळा हुडको येथील माहेर असलेल्या नुरूनिसा नवीद शेख वय २० यांचा विवाह छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड येथील शेख नविद शेख अक्रम यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेराहून १० लाख रूपयांची मागणी करण्यात आली. विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही या रागातून तिला शिवीगाळ करून शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. त्यानंतर विवाहितेला घटस्फोट देण्याची धमकी देण्यात आली. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती शेख नविद शेख अक्रम, सासरे अक्रम शेख बिबन, सासू शाहीनबी शेख अक्रम, कमरूनिसा शेख अरशिद, शेख अरशिद शेख बिबन, जाविद शेख अक्रम, मुस्कानबी शेख जाविद, जुनेद शेख अक्रम, आयशाबी शेख जुनेद, शेख आबिद शेख अक्रम सर्व रा. कन्नड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कालसिंग बारेला हे करीत आहे.


Protected Content

Play sound