Home क्राईम दुचाकी चालविण्यावरून तरूणावर प्राणघातक हल्ला !

दुचाकी चालविण्यावरून तरूणावर प्राणघातक हल्ला !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात दुचाकी चालविण्यावरून एका तरूणाला तीन जणांनी शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी व लाकूड आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील रहिवाशी असलेला शेख आरीफ शेख यासीन वय २५ हा बुधवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता ताज नगर भागातून दुचाकीने जात होता. या कारणावरून संशयित आरोपी आवेश उर्फ काल्या शेख जहांगीर, समिर उर्फ लोचा शेख शफी आणि अरशद मुजफ्फर खान तिघे राहणार नशिराबाद ता. जळगाव यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच इतरांनी लाकडी दांडा आणि लोखंडी सळईने मारहाण करून दुखापत केली. जखमी झालेल्या शेख आरीफ शेख यासीन याने उपचार घेतल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शनिवारी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेश मेढें हे करीत आहे.


Protected Content

Play sound