जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसून अश्लिल चाळे करत त्यांचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना शनिवारी ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावातील ४० वर्षीय महिला वास्तव्याला आहेत. शनिवारी ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता पिडीत महिला ही घरात झोपलेली असतांना संशयित आरोपी धनराज भिला सोनवणे हा अनधिकृतपणे महिलेच्या घरात घुसून महिलेसोबत अश्लिल चाळे करत त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी धनराज सोनवणे याच्या विरोधात दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण हे करीत आहे.




