Home Cities जळगाव संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त जळगावात उद्या भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त जळगावात उद्या भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विविध घटकांमध्ये एकात्मता, ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी दृढ करण्याच्या उद्देशाने ही रॅली विशेष आकर्षण ठरणार आहे. शहरातील सर्व समाजबांधव आणि भगिनींना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संताजी महाराजांच्या ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त समाजात उत्साहाचे वातावरण असून, रॅलीसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. सोमवारी सकाळी ९:३० वाजता तरुण कुढापा चौकात सहभागी एकत्रित होतील. तेथून रॅली पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चित्रा चौक, नेरी नाका या मार्गाने पुढे जाणार आहे. पुढे एसटी वर्कशॉपमार्गे कोल्हे विद्यालयातून संताजी जगनाडे महाराज उद्यान येथे रॅलीचा समारोप होईल.

या मोटरसायकल रॅलीचे उद्दिष्ट समाजात एकात्मता निर्माण करण्याबरोबरच संताजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणे असे आयोजकांनी सांगितले. समाजातील तरुण वर्गाने या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. रॅलीदरम्यान शिस्तबद्धता आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळले जातील, यासाठी स्वयंसेवकांची टीमदेखील सज्ज करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे आवाहन अध्यक्ष प्रशांत सुरळकर, बबन चौधरी आणि रामचंद चौधरी यांनी संयुक्तपणे केले असून, त्यांनी सर्व समाजबांधव आणि भगिनींना सकाळी वेळेवर उपस्थित राहून संताजी महाराजांच्या जयंतीला अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound