Home क्राईम वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई !

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव व शहरातील पांझरापोळ चौक परिसरातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी 4 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता कारवाई करत ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांझरापोळ चौक परिसरात शनिपेठ पोलिस गुरूवारी ४ डिसेंबीरोजी रात्रीची ग्रस्त घालत असतांना पहाटे ५ वाजेच्या सुमारास डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ३१९२) हा अवैधरित्या वाळू वाहतूक करत असताना मिळून आला. दरम्यान पोलिसांनी चालकाकडे वाळू वाहतूक संदर्भात विचारणा केली असता त्यांनी त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान शनिपेठ पोलिसांनी कारवाई करत वाढवणे भरलेला डंपर हा जमा केला आहे. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल गणेश ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालक बळवंत ओमकार साळुंखे वय ४०, रा. खेडी ता. जळगाव यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पाटील हे करीत आहेत.


Protected Content

Play sound