अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जि.प. प्राथमिक केंद्र शाळा, फापोरे बु. येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजात दिव्यांग विद्यार्थ्यांविषयी समतेची भावना, समान संधी आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या उपक्रमाला पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पाटील, गटसमन्वयक रविंद्र साळुंखे आणि फापोरे बु. केंद्रप्रमुख राजेंद्र गवते यांनी विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन दिले. मुख्याध्यापक सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांनी दिवस अधिक अर्थपूर्ण बनवला. कार्यक्रमात श्री ज्ञानेश्वर शिंपी, श्रीमती दीपाली पवार आणि श्रीमती पुनम पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

दिवसाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे काढण्यात आलेली जनजागृती रॅली. या रॅलीतून दिव्यांगांच्या 21 प्रकारांविषयी माहिती, त्यांना मिळणाऱ्या सरकारी सुविधा, हक्क, योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. विद्यार्थ्यांनी फलक, घोषवाक्ये आणि जनजागृती संदेशांच्या माध्यमातून दिव्यांगांविषयी संवेदनशीलता आणि समभावाची भावना जागृत केली.
दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने माजी 10 वी उत्तीर्ण दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा फुलपुष्प देऊन गौरव करण्यात आला. मुलांना शालेय साहित्य भेटवस्तू देऊन प्रोत्साहन दिले गेले.
विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा म्हणून नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कोलाज स्पर्धा आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांचे नियोजन विशेष शिक्षक शितल भटा भदाणे यांनी केले.