Home आरोग्य वासुदेव नेत्रालयाचा उपक्रम कौतुकास्पद : मतदान करणाऱ्यांसाठी नेत्रतपासणी फीवर ५०% सवलत जाहीर

वासुदेव नेत्रालयाचा उपक्रम कौतुकास्पद : मतदान करणाऱ्यांसाठी नेत्रतपासणी फीवर ५०% सवलत जाहीर

0
127

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार जागृतीचे नवनवीन उपक्रम राबवण्याची परंपरा जपणाऱ्या वासुदेव नेत्रालयाने यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही अनोखी पुढाकार घेतली आहे. मतदानाचा टक्का वाढावा आणि प्रत्येक मतदाराने आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करावे यासाठी मतदान करून आलेल्या नागरिकांना नेत्रतपासणी फीमध्ये तब्बल ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय नेत्रालयाने घेतला आहे.

मतदार राजा जागा हो!
लोकशाहीचा धागा हो!!
दाखवुनी बोटावरील अभिमानाचा डाग!!!
नेत्र तपासणी फी वर 50% सुट खास!!!!

असे म्हणत मतदान वासुदेव नेत्रालयाने जनजागृती मोहीम राबविली आहे.

या जनजागृती उपक्रमात २ डिसेंबरच्या मतदानानंतर ४ ते ११ डिसेंबर या कालावधीत सवलत मिळणार असून, वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयात मतदारांनी शाई लागलेले बोट दाखवून ही सुविधा उपभोगता येणार आहे. नेत्ररोग तज्ञ डॉ. रेणुका पाटील आणि डॉ. नितु पाटील यांनी लोकशाहीची भावना जागृत ठेवण्याच्या हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांना प्रोत्साहन म्हणून ही विशेष सवलत देण्यात येत आहे.

भुसावळ, वरणगाव, मुक्ताईनगर, बोदवड आणि यावल-रावेर विधानसभेतील मतदारांना या योजनेचा लाभ होणार असून, या भागांमध्ये मोठ्या उत्साहाने उपक्रमाची माहिती पोहोचविण्यात येत आहे. प्रशासन, सेवाभावी संस्था आणि विविध सामाजिक गट मतदार जागृतीसाठी प्रयत्न करत असताना खासगी संस्थांनीही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत डॉ. पाटील दाम्पत्यांनी व्यक्त केले.

वासुदेव नेत्रालयाने २०१४ पासून प्रत्येक लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकांत अशा प्रकारचे उपक्रम राबवत समाजाशी असलेले आपले नाते जपले आहे. मागील निवडणुकांमध्ये राबवलेल्या उपक्रमाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय, वरणगाव नगरपरिषद तसेच भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाकडून त्यांना विशेष गौरवपत्राने सन्मानित करण्यात आले आहे.

मतदान हा लोकशाहीचा सर्वात मोठा सण असल्याचे सांगताना डॉ. नितु पाटील म्हणाले की, “प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे लोकशाहीची मुळे अधिक मजबूत करणे होय. त्यासाठी जनजागृती आणि प्रोत्साहन गरजेचे आहे. ४ ते ११ डिसेंबर दरम्यान नेत्र तपासणी शुल्कात ५०% सवलत देण्यात येणार असून मतदारांनी याचा लाभ घ्यावा.”

वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाने मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी ४ ते ११ डिसेंबरदरम्यान नेत्रतपासणी फीवर ५०% सवलत जाहीर केली असून, हा उपक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगासह विविध शासकीय संस्थांनी कौतुकास्पद म्हणून मान्यता दिला आहे.


Protected Content

Play sound