एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पूर्ण भागाच्या विकासाला नवी गती देण्याचे आश्वासन देत आमदार अमोल पाटील यांनी नागरिकांसमोर ठाम भूमिका मांडली. नरेंद्र ठाकूर यांना निवडून दिल्यास या भागातून विकासाची गंगा शंभर टक्के वाहील, असे ते म्हणाले. स्थानिक समस्यांच्या तातडीने निराकरणासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सभेत आमदार पाटील म्हणाले की, पूर्ण भागात शंभर टक्के काँक्रिटीकरणाचे रस्ते, भूमिगत गटारी, स्ट्रीट लाइट सुविधा आणि इतर नागरी सोयी विकसित करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेत त्यांचे निराकरण तातडीने करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गेल्या काही वर्षांत प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर निर्णयक्षम पद्धतीने काम करून पूर्ण भागाचा चेहरा बदलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या सभेला भाजपचे भैया पाटील, एस. आर. पाटील, माजी नगराध्यक्ष किशोरभाऊ निंबाळकर, राजू आबा चौधरी, तसेच कार्यकर्त्यांमध्ये अमोल जाधव, संजय पाटील, प्रमोद महाजन, शालिकभाऊ गायकवाड, चिंतामण पाटील, सागर सिंग, मोतीवाले, मंजुळाबाई चौधरी, मालती वाणी आदींसोबत अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितीमुळे सभा उत्साहात पार पडली, तसेच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे जाणवले.
नागरिकांनीही सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विकासाच्या आश्वासनावरील विश्वास व्यक्त केला. पूर्ण भागात आराखडा-बद्ध पद्धतीने विकासाची कामे झाली, तर येथील पायाभूत सुविधा मजबूत होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी नोंदवली. सभेतील संवादातून स्थानिक नेतृत्व आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले.



