Home Cities भुसावळ रजनीताई सावकारे यांच्या प्रचारफेरीला ‘महायुती’चे बळ; ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत

रजनीताई सावकारे यांच्या प्रचारफेरीला ‘महायुती’चे बळ; ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी भुसावळ नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनीताई सावकारे यांनी गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्र. १५ व १६ मध्ये जोरदार प्रचारफेरी काढली.

महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) आणि लहुजी शक्ती सेना यांच्या संयुक्त ताकदीचे प्रदर्शन या प्रचार फेरीत दिसून आले. वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे यांच्या संपर्क कार्यालयातून सकाळी प्रचार अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

प्रचारफेरीत प्रभाग क्रमांक १५ मधील उमेदवार आशाताई पाटील आणि प्रभाग १६ मधील उमेदवार शमाबिबी या प्रमुख स्थानिक नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला. घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आणि त्यांच्या समस्या जाणून घेत, सौ. रजनीताई सावकारे यांनी महायुतीच्या विकासाभिमुख अजेंड्यावर मतदारांचे लक्ष वेधले.

यावेळी महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विविध आघाड्यांचे तसेच मोर्चांचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी ‘महायुती’च्या बाजूने जोरदार घोषणाबाजी करत निवडणुकीचे वातावरण निर्मिती केली. नगराध्यक्ष पदासाठी सौ. रजनीताई सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र या प्रचार दौऱ्यात स्पष्टपणे दिसून आले. प्रभाग क्रमांक १५ आणि १६ मधील नागरिकांच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने महायुतीच्या आशा पल्लवित झाल्या असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हा प्रचार निर्णायक ठरेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound