Home क्राईम झोपलेल्या अवस्थेत खाली पडल्याने परप्रांतीय तरूणाचा दुदैवी मृत्यू

झोपलेल्या अवस्थेत खाली पडल्याने परप्रांतीय तरूणाचा दुदैवी मृत्यू

0
112

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील व्ही सेक्टर येथील एका कंपनीत झोपलेला असतांना परप्रांतीय तरूण हा खाली पडून गंभीर दुखापत होवून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मंगलसिंग रामलखन सरोज वय २७ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश असे मयत झालेल्या परप्रांतीय तरूणाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, मंगलसिंग सरोज हा एमआयडीसीमधील व्ही सेक्टर मधील के.एस.कोल्ड कंपनी कामाला होता. बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी कंपनीत झोपलेला असतांना सकाळी ९ वाजता अचानक तो खाली पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound