Home क्राईम नशिराबाद शिवरातील शेतात आग, सोयाबिन पीक जळून खाक

नशिराबाद शिवरातील शेतात आग, सोयाबिन पीक जळून खाक

0
118

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारातील शेतातील अचानक कापून ठेवलेल्या सोसाबिन पिकाला आग लागल्याची घटना मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडली. आग लागण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, देविदास कौतिक पाटील वय ५५ रा. कुसुंबा खुर्द ता. जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याचे नशिराबाद शिवारातील शेत गट क्रमांक १८१५ मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी सोयाबिन पिकाची कापनी करून ठेवलेले होते. दरम्यान मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक सोयाबिन पिकाला आग लागली. या आगीत सोयाबिन पिक जळून खाक झाले आहे. यासंदर्भात देवीदास पाटील यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound