Home क्राईम शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
158


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील बोरनार शिवारातील शेतात काम करत दाम्पत्याला काहीही कारण नसतांना शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील बोरनार शिवारातील शेतात बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दाम्पत्य हे शेतात काम करत असतांना प्रेम गोपीचंद धनगर रा. बोरनार ता जळगाव हा शेतात आला आणि काहीही कारण नसतांना दोघांना शिवीगाळ केली. तसेच महिलेचा हाता पकडून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची देखील धमकी दिली. याप्रकरणी महिलेने रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी प्रेम धनगर याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound