Home Cities चोपडा अडावद विकासो चेअरमनपदी शोभाबाई पाटील बिनविरोध ; १११ वर्षांत प्रथमच महिला नेतृत्वाची...

अडावद विकासो चेअरमनपदी शोभाबाई पाटील बिनविरोध ; १११ वर्षांत प्रथमच महिला नेतृत्वाची निवड

0
134

अडावद (ता. चोपडा)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये शोभाबाई संजय पाटील यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या १११ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलेला चेअरमन पदाचा मान मिळाल्याने अडावद परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुधवार १९ नोव्हेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पडली. चेअरमन पदासाठी शोभाबाई पाटील यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भुषण बारी यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यामुळे महिलांच्या नेतृत्वाला सहकारी क्षेत्रात मिळालेला हा पहिलाच आणि मोलाचा सन्मान ठरला आहे.

या सभेला व्हा. चेअरमन वैजयंताबाई माळी, भुषण देशमुख, रमेश काबरे, प्रभाकर माळी, प्रदीप पाटील, प्रकाश माळी, गोटू धनगर, रमेश ठाकूर, रामदास चौधरी, सचिन महाजन, शकीलोद्दीन शेख यांसह संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी भुषण बारी यांना सचिव छगन गवळी, संभाजी देशमुख आणि प्रशांत देशमुख यांनी आवश्यक सहकार्य केले.

चेअरमनपदी निवड जाहीर होताच परिसरातील विविध मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. लोकनियुक्त सरपंच बबनखाँ तडवी, माजी सरपंच भावना माळी, ग्रामपंचायत सदस्या भारती सचिन महाजन, विजिता पाटील, मंगल पाटील, अश्विनी पाटील, पुनम पाटील, शीतल पाटील, माजी चोसाका संचालक मनोज देशमुख, माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख, गुलाबराव पाटील, पत्रकार नवल चव्हाण, संजय देशमुख यांच्यासह अनेकांनी शोभाबाई पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

 


Protected Content

Play sound