Home Cities जळगाव जिल्ह्यातील छाननीचा निकाल जाहीर : वैध-अवैध अर्जांचे चित्र स्पष्ट, आता माघारीची प्रतीक्षा

जिल्ह्यातील छाननीचा निकाल जाहीर : वैध-अवैध अर्जांचे चित्र स्पष्ट, आता माघारीची प्रतीक्षा

0
120

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा, जामनेर, सावदा, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, रावेर, एरंडोल, फैजपूर या १६ नगरपरिषदांसह मुक्ताईनगर व शेंदुर्णी या दोन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया वेगात सुरू आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी वैध-अवैध अर्जांचे प्राथमिक चित्र स्पष्ट झाले असून, अंतिम घडामोडींसाठी आता माघारीची प्रक्रिया निर्णायक ठरणार आहे.

भुसावळ नगरपरिषदेसाठी नगरसेवक पदाचे ५३८ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीनंतर ४०३ अर्ज वैध, तर १३५ अर्ज अवैध ठरले. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या १८ अर्जांपैकी १२ वैध व ६ अवैध ठरले. अमळनेरमध्ये नगरसेवक पदासाठी ३७७ पैकी २९२ अर्ज वैध तर ८५ अवैध ठरले. नगराध्यक्ष पदाच्या ३० अर्जांमध्ये २२ वैध व ८ अवैध घोषित झाले.

चाळीसगावमध्ये नगरसेवक पदाचे ३३५ अर्ज आले असून त्यापैकी २५५ वैध तर ८० अवैध ठरले. नगराध्यक्ष पदासाठी ९ मधून ७ वैध, २ अवैध ठरले. चोपड्यात नगरसेवक पदाचे २६२ अर्ज आलेत, त्यापैकी २२४ वैध व ३८ अवैध ठरले. नगराध्यक्ष पदासाठी १३ पैकी ९ वैध व ४ अवैध अर्ज घोषित झाले.

जामनेरमध्ये नगरसेवक पदाच्या २४४ अर्जांपैकी तब्बल १५१ अर्ज अवैध ठरले असून ९३ अर्ज वैध मानले गेले. नगराध्यक्ष पदासाठी आलेल्या ९ अर्जांत ४ वैध व ५ अवैध आहेत. पाचोरा नगरसेवक पदासाठी १६७ अर्जांपैकी १२२ वैध व ४५ अवैध ठरले, तर नगराध्यक्ष पदाच्या ६ अर्जांतून ५ वैध व १ अवैध ठरला.

यावलमध्ये नगरसेवक पदासाठी १३० अर्ज आले असून त्यापैकी १०२ वैध व २८ अवैध घोषित झाले. नगराध्यक्ष पदासाठी ७ पैकी ६ अर्ज वैध व १ अवैध ठरला. नशिराबादमध्ये नगरसेवक पदाच्या १४४ अर्जांपैकी १२९ वैध व १५ अवैध ठरले, तर नगराध्यक्ष पदाच्या १५ मधून १२ वैध व ३ अवैध ठरले.

वरणगावमध्ये नगरसेवक पदाच्या १५० अर्जांपैकी १२३ वैध व २७ अवैध ठरले. नगराध्यक्ष पदासाठी १७ पैकी १३ वैध व ४ अवैध ठरले. पारोळा येथे नगरसेवक पदासाठी दाखल १५५ अर्जांपैकी १३२ वैध व २३ अवैध ठरले. नगराध्यक्ष पदाचे ८ अर्जांपैकी ५ वैध व ३ अवैध घोषित झाले.

भडगावमध्ये नगरसेवक पदासाठी १३५ मधून १०० अर्ज वैध व ३५ अवैध ठरले, तर नगराध्यक्ष पदाचे सर्व ५ अर्ज वैध ठरले. धरणगावमध्ये नगरसेवक पदांसाठी दाखल २८७ अर्जांपैकी २५८ वैध व २९ अवैध ठरले. नगराध्यक्ष पदासाठी १५ पैकी १४ अर्ज वैध तर एक अर्ज अवैध ठरला.

सावद्यात नगरसेवक पदाचे १४५ अर्ज आले होते. त्यापैकी ११२ वैध व ३३ अवैध ठरले. नगराध्यक्ष पदासाठी आलेल्या १० अर्जांत ८ वैध व २ अवैध आहेत. रावेरमध्ये नगरसेवक पदाच्या २१८ अर्जांपैकी १७७ वैध व ४१ अवैध ठरले. नगराध्यक्ष पदासाठी २१ पैकी १८ वैध व ३ अर्ज अवैध घोषित झाले.

एरंडोलमध्ये नगरसेवक पदासाठी आलेल्या ११६ अर्जांपैकी १०३ वैध व १३ अवैध ठरले. नगराध्यक्ष पदासाठी १२ पैकी ८ वैध व ४ अवैध ठरले. फैजपूरमध्ये नगरसेवक पदाचे १६१ अर्जांपैकी १३५ वैध व २६ अवैध, तर नगराध्यक्ष पदाचे १२ अर्जांपैकी ८ वैध व ४ अवैध ठरले.

शेंदुर्णी नगरपंचायतीत नगरसेवक पदाच्या १५४ अर्जांपैकी तब्बल ९८ अर्ज अवैध तर केवळ ५४ वैध ठरले. नगराध्यक्ष पदासाठी २२ अर्ज प्राप्त झाले असून ११ वैध व ११ अवैध ठरले. मुक्ताईनगरमध्ये नगरसेवक पदाचे १२४ अर्जांपैकी ८१ वैध व ४३ अवैध ठरले असून नगराध्यक्ष पदासाठीच्या १३ अर्जांत ७ वैध व ६ अवैध ठरले आहेत.

छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता माघारीच्या अखेरच्या दिवशी किती उमेदवार स्पर्धेतून बाहेर पडतात यावर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

 


Protected Content

Play sound