Home क्राईम दुदैवी घटना : होतकरू तरूणावर काळाचा घाला; भरधाव आयशने दुचाकीला उडविले !

दुदैवी घटना : होतकरू तरूणावर काळाचा घाला; भरधाव आयशने दुचाकीला उडविले !

0
296

जळगाव/पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील कृष्णा पुरी येथे राहणाऱ्या एका होतकरू तरुणाचा झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी, १८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा ११ वाजण्याच्या सुमारास जारगाव चौफुली येथे ही घटना घडली. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत तरुणाचे नाव सुनील उत्तम सोनार (वय २६) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सोनार हा जारगाव चौफुली येथे चहाची टपरी चालवून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दररोजप्रमाणे मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता तो आपली टपरी बंद करून दुचाकीने घरी कृष्णापुरी येथे परत जात होता. याचवेळी घारगाव चौफुली जवळ एका अज्ञात आयशर वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सुनील गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर जखमी झालेल्या सुनील सोनार याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मध्यरात्री बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे सोनार कुटुंबियांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुनीलच्या पश्चात त्याची आई, भाऊ आणि वाहिनी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या मुलाच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातासंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अज्ञात आयशर वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.


Protected Content

Play sound