Home Cities भुसावळ भुसावळात भाजपचे पिंटू कोठारी आणि किरण कोलते यांनी भरले अर्ज

भुसावळात भाजपचे पिंटू कोठारी आणि किरण कोलते यांनी भरले अर्ज

0
213

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नामनिर्देशन दाखल करण्याला वेग आला असून, अवघे दोन दिवस उरलेले असताना इच्छुक उमेदवार तसेच त्यांच्या सुचकांची भुसावळ प्रांत कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक प्रक्रियेतील अंतिम टप्पा जवळ आल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक यांची सकाळपासूनच प्रचंड लगबग दिसून आली.

वार्ड क्रमांक 21 (ब) मधून भाजप पक्षाकडून पिंटू कोठारी यांनी नामनिर्देशन भरत अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यांच्यानंतर किरण कोलते यांनीही भाजप तर्फे आपला फॉर्म दाखल केला. दोन्ही अर्ज भरताना पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. याचबरोबर इतरही विविध पक्ष व अपक्ष उमेदवार, महिला उमेदवार, मुस्लिम समाजातील पुरुष आणि महिला उमेदवार यांनीही कार्यालयात येऊन आपापले अर्ज दाखल केल्याने परिसर पूर्णपणे गजबजून गेला होता.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार उमेदवारासोबत फक्त एकाच सुचकाला कार्यालयाच्या आत प्रवेशाची परवानगी असल्याने, उर्वरित कार्यकर्त्यांना बाहेरच थांबावे लागत होते. यामुळे उमेदवार आणि पोलिसांमध्ये अनेक ठिकाणी शाब्दिक वाद झाल्याचेही दिसून आले. पोलिसांकडून नाहक अडथळा आणला जात असल्याची तक्रार काही समर्थकांनी व्यक्त केली. तथापि, पोलिस प्रशासनाने शिस्त व सुरक्षितता राखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचे सांगत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी उमेदवारांची वाढती लगबग आणि पक्षीय हालचालींमुळे आगामी निवडणुकीत चुरस तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound