जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या रायपूर फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या अपघातात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजता घडली आहे. या संदर्भात गुरुवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकी धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश शंकर बाविस्कर वय २१, रा. कुसुंबा ता. जळगाव हा तरुण बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजता रायपूर फाट्याजवळून दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीए ३८१९) ने जात असताना समोरून येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ इआर ३७७९) वरील चालकाने रॉंग साईड येवून गणेश बाविस्कर यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात गणेश हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान या संदर्भात गणेश बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवरील अज्ञात चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कपूर तडवी हे करीत आहे.




