Home क्राईम जळगावात घरफोडी ; लाखोंचा ऐवज लंपास

जळगावात घरफोडी ; लाखोंचा ऐवज लंपास

c6d3b6aa 92c2 46b7 953a 2300fbc110c2
c6d3b6aa 92c2 46b7 953a 2300fbc110c2

c6d3b6aa 92c2 46b7 953a 2300fbc110c2
 

जळगाव प्रतिनिधी|शहरातील गायत्री नगरातीमधील गायत्री मंदिरासमोरील बंद घर फोडत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, संजय नारायण मालपुरे (वय 45 रा. प्लॉट नंबर 43, गायत्री नगर) यांचे गायत्री मंदिरासमोर यांचे घर आहे. त्यांचे वडील नारायण राजाराम मालपुरे यांचे पुण्यात निधन झाल्याने अंत्यविधीसाठी मालपुरे आपल्या परिवारासह शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पुण्याला गेले. अंतविधी आटोपून रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

 

यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडून कपाटातील एक लाख रुपये रोख, तीन तोळ्याची सोन्याची पोत, 3 ग्रॅम कानातले दागिने, 5 ग्रॅमची अंगठी आणि 10 ग्रॅमची सोन्याची चैन असा अंदाजे दोन ते अडीच लाखाचा ऐवज चोरून नेला. संजय मालपुरे हे एमआयडीसीतील कोपटा दालमिल कंपनीत कामाला आहे. तर त्यांची पत्नी रत्ना संजय मालपुरे या क्रीडा रसिक प्राथमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.


Protected Content

Play sound