जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील लक्ष्मी नगर येथील सेवानिवृत्त वृध्दाचे बंद घर फोडून घरातून फ्रिज, टीव्ही, कुलर, गॅस हंडी, पातेले यासह इतर साहित्य चोरून नेल्याची घटना मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र जगन्नाथ दुसाने वय ६२ रा. लक्ष्मी नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. ११ नोव्हेंबर रोजी त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने संधी सांधून बंद घर फोडून घरातून ५२ हजार रूपये किंमतीचे फ्रिज, टीव्ही, कुलर, गॅस हंडी, पातेले यासह इतर साहित्य असा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता समोर आला. याप्रकरणी राजेंद्र दुसाने यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसान अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गिरीश पाटील हे करीत आहे.




