Home राजकीय सावद्यातील उद्योजक सुहास भंगाळे राजकारणात पदार्पण करणार ?

सावद्यातील उद्योजक सुहास भंगाळे राजकारणात पदार्पण करणार ?


सावदा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा शहरातील प्रख्यात उद्योजक सामाजिक कार्यकर्ते तसेच जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुहास भंगाळे हे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत राजकारणात पदार्पण करणार असल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरू लागली आहे. त्यांची राजकारणातील एन्ट्री ही लक्षवेधी ठरणारी अशीच राहणार आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुहास भंगाळे यांच्या राजकीय प्रवेशाची तयारी सुरू असून, ते कोणत्या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत राहून अनेक जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच त्यांच्याबाबत शहरात आणि परिसरात भक्कम जनसंपर्क व चांगली लोकांनुभूती निर्माण झाली आहे. सुहास भंगाळे हे ज्या पक्षात प्रवेश करतील त्या पक्षाला नक्कीच मोठा राजकीय फायदा होईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना सुहास भंगाळे यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून आगामी काही दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ते लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील असे मानले जात आहे.


Protected Content

Play sound