Home Cities यावल पाटील दाम्पत्यासमोर उभे राहणार तरी कोण ? : यावलकरांना मोठी उत्सुकता !

पाटील दाम्पत्यासमोर उभे राहणार तरी कोण ? : यावलकरांना मोठी उत्सुकता !


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील हे प्रभागातून नगरसेवक पदासाठी तर त्यांच्या सौभाग्यवती छाया पाटील या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्चीत झाले असून त्यांच्या विरोधात नेमके कोण उभे ठाकणार ? याबाबत यावलकरांना मोठी उत्सुकता लागली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रीक निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाले असुन,नगर परिषदच्या निवडणुकी साठी ईच्छुक उमेदवारांनी प्रचारास कमी वेळ मिळणार असल्याने आपआपल्या प्रभागात जनसंपर्क सुरू केला असुन,यात नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक प्रबळ उमेदवार म्हणुन सध्या यावल शहरात चर्चेत असलेल्या सौ.छाया पाटील या आघाडीवर आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे पती तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील हे देखील क्रमांक अकरा मधील नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत .दरम्यान माजी नगराध्यक्ष अतुल पाटील व त्यांच्या पत्नी सौ. छाया पाटील यांनी मागील तिन ते चार महीन्या पासुन यावल शहरात मतदारांशी होम टू होम संपर्क करीत असल्याचे दिसुन येत आहे. आता या प्रचाराला गती आली आहे.

अतुल पाटील यांची ओळख राजकीय क्षेत्रात एक अभ्यासु व पारदर्शी व्यक्तिमत्व म्हणुन केली जाते . दरम्यान यावल नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवाराचे आरक्षीत झाल्याने त्यांनी आपल्या पत्नी सौ छाया पाटील या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जाहीर केल्या असून,असे असतांना त्यांच्या विरोधकांना त्यांच्या तोडीचा तुल्यबळ उमेदवार अद्याप पर्यंत जाहीर केला नाही. गेल्या काही दिवसापासुन शहरात अतुल पाटील यांच्या पत्नीच्या विरोधात उमेदवारी ‘याला की त्याला’ ? अशा नांवांची चर्चा रंगु लागल्या असुन, याच्या पलीकडे काही ही होतांना दिसुन येत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

तर दुसरीकडे, अर्ज भरण्यास प्रारंभ होण्याआधीच अतुल पाटील आणि सौ. छाया पाटील यांनी शहर पिंजून काढण्यास सुरवात केल्याचे दिसून येत आहे. त्यांनी खूप आधी तयारी सुरु केल्याची बाब ही लक्षणीय अशीच आहे.


Protected Content

Play sound