Home धर्म-समाज स्वामी समर्थ केंद्रांमध्ये स्तोत्र व मंत्र पठणाचा विक्रमी कार्यक्रम

स्वामी समर्थ केंद्रांमध्ये स्तोत्र व मंत्र पठणाचा विक्रमी कार्यक्रम

67e82003 4612 4975 86fc 18430687efd4
67e82003 4612 4975 86fc 18430687efd4

67e82003 4612 4975 86fc 18430687efd4

भुसावळ, प्रतिनिधी | अखिल भारतीय गुरुकुल पीठ दिंडोरी दरबारचे प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आज (दि.२१) संपूर्ण देशभरातील श्री स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्रांमध्ये कशाप्रकारे संस्कार देण्याचे कार्य चालते, ते दर्शवण्यासाठी स्तोत्र व मंत्र पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये करण्यात आली आहे.

 

सगळ्या केंद्रात एकाचवेळी म्हणजे सकाळी १०.४५ ते ११.४५ यावेळात हा कार्यक्रम घेण्यात आला. येथील केंद्रात या कार्यक्रमासाठी ११८ विद्यार्थी, २१९ विद्यार्थिनी व १०० पालक प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच यावेळी माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रमही संपन्न झाला.


Protected Content

Play sound