धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील नेहरू नगरात असलेल्या ईलेक्ट्रीक दुकानातून ४० हजार रूपये किंमतीचे ईलेक्ट्रीक साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील नेहरू नगरात सचिन सुभाष भागवत वय ४८ रा. कोट बाजार, धरणगाव यांचे सब मर्सिबल पंप दुरूस्तीसाठी वर्क शॉप आहे. ३० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान त्यांचे दुकान बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडून दुकानातून पितळी बुशींग, कॉपर वायर आणि इतर साहित्य असे एकुण ४० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता समोर आला. याप्रकरणी सचिन भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.




