जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बकरी घेण्यात येण्यावरून झालेला हा वाद तरुणांमुळे झाला. या गैरसमजातून एका महिलेने तरुणाला शिवीगाळ करत चपटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बाजूला पडलेला लोखंडी झरा तरुणाच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता सुप्रीम कॉलनीत घडली आहे. या संदर्भात रात्री 10 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, घनश्याम मोहन यादव (वय 32 रा. सुप्रीम कॉलनी जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबीयासह वास्तव्याला आहे ल. दरम्यान सुरू युवराज कोळी व छाया दर्शन पठारे यांच्यात बकरी देण्या घेण्यावरून वाद सुरू होता आणि हा वाद घनश्याम यादव यांच्यामुळे झाला, या गैरसमजातून छाया पठारे या महिलेने घनश्याम यादव याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच केळीचे वेफर बनवणाऱ्या लोखंडी झरा डोक्यावर टाकून गंभीर दुखापत केली. दरम्यान या संदर्भात रात्री 10 वाजता घनश्याम यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छाया दर्शन पठारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहे.




