Home Cities जळगाव गंमत जोडशब्दांची रीडिंग अँड लर्निंग सेंटर : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देणारे ‘जिवंत...

गंमत जोडशब्दांची रीडिंग अँड लर्निंग सेंटर : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देणारे ‘जिवंत पुस्तकालय’


धामणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शाळेत जाण्यापूर्वीच्या लहान मुलांना लिहिता-वाचता येत नसले तरी, त्यांचं पुस्तकांशी नातं घट्ट असावं, हीच प्रेरणादायी संकल्पना घेऊन ‘गंमत जोडशब्दांची रीडिंग अँड लर्निंग सेंटर’ कार्यरत आहे. येथे प्रत्येक मुलाला पुस्तकांचा मित्र बनवण्याचे अनोखे काम प्रभावती पाटील यांनी सुरू केले असून, हे केंद्र खऱ्या अर्थाने मुलांसाठी एक ‘जिवंत पुस्तकालय’ ठरत आहे.

या उपक्रमामध्ये अशा मुलांना सहभागी करण्यात येतं, ज्यांना अजून वाचता किंवा लिहिता येत नाही, किंवा जी मुलं नियमित शाळेत जात नाहीत. या मुलांना पुस्तकं समजण्यासाठी केंद्रात खास चित्रमय कथा, गोष्टी सांगण्याचे सत्र, आणि गप्पा-खेळ यांचं संयोजन केले जाते. त्यामुळे वाचनाची गोडी सहजपणे निर्माण होते.

पुस्तकांमधील रंगीत चित्रं, गोष्टींच्या प्रसंगांवर आधारित नाट्यरूपांतरं, आणि मित्रांसोबत एकत्र वाचन यामुळे मुलं पुस्तकांच्या जगात रममाण होतात. शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन हे केंद्र मुलांना शिकण्याचा आनंद देतं आणि “पुस्तक हेच माझं खरं मित्र आहे” हा विश्वास बालमनात दृढ करतं.

या केंद्रात एज्युकेटरच्या मार्गदर्शनाखाली विविध वाचन व शिकण्याच्या क्रियाकलापांद्वारे मुलांना पुस्तकांच्या माध्यमातून कल्पनाशक्ती, भाषिक अभिव्यक्ती आणि सामाजिक जाण यांचा विकास साधता येतो. हे पुस्तकालय केवळ पुस्तके देणारे ठिकाण नाही, तर मुलांच्या भावविश्वाशी नातं जोडणारं प्रेरणादायी व्यासपीठ आहे.


Protected Content

Play sound