Home Cities जळगाव लोहपुरुष सरदार पटेलांना कंजारभाट समाज युवा फाउंडेशन कडूनअभिवादन

लोहपुरुष सरदार पटेलांना कंजारभाट समाज युवा फाउंडेशन कडूनअभिवादन


जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जळगावातील कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे लेवा भवन येथे असलेल्या त्यांच्या अर्धकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. देशाच्या एकतेचे प्रतीक असलेल्या सरदार पटेल यांच्या कार्याचे स्मरण करत, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

या प्रसंगी फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याचे आणि त्यांच्या देशासाठीच्या योगदानाचे गौरवपूर्ण शब्दांत स्मरण करण्यात आले. उपस्थितांनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेवर भर देत समाजात बंधुता आणि ऐक्याचा संदेश दिला.

कार्यक्रमास सचिव राहुल नेतलेकर, योगेश बागडे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, पंकज गागडे, राहुल दहियेकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी या प्रसंगी सरदार पटेल यांचे नेतृत्व, धैर्य आणि दूरदृष्टी हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरावा, असा विश्वास कंजरभाट समाज युवा फाउंडेशन तर्फे व्यक्त करण्यात आला. उपस्थित सर्वांनी सरदार पटेल यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजहितासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

 


Protected Content

Play sound