Home Cities यावल यावल नगर परिषद निवडणुकीत भाजपामध्ये उत्साह; नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवकपदासाठी ५५ इच्छुकांचे...

यावल नगर परिषद निवडणुकीत भाजपामध्ये उत्साह; नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवकपदासाठी ५५ इच्छुकांचे अर्ज दाखल


यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, यावल नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षात उमेदवार निवडीची प्रक्रिया उत्साहात पार पडली. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदाच्या अर्ज स्वीकृतीचा शेवटचा दिवस गुरुवार (३० ऑक्टोबर) होता. या दिवशी नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवकपदासाठी तब्बल ५५ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

यावल नगर परिषदेत एकूण २३ प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपकडून उमेदवारांच्या निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. नगराध्यक्षपदासाठी ७ जणांनी आपली इच्छा व्यक्त केली असून, प्रत्येक प्रभागातून अनेक उमेदवारांनी नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केल्याने पक्षातील निवड प्रक्रिया चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजपाचे यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, तालुका सरचिटणीस भरत पाटील, ज्ञानेश्वर तायडे आणि शहराध्यक्ष राहुल बारी यांच्याकडे उमेदवारांचे अर्ज स्वीकृतीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या समितीने पक्षाच्या सूचनांनुसार सर्व इच्छुकांचे अर्ज व्यवस्थितरीत्या संकलित केले.

अर्ज स्वीकृतीच्या प्रक्रियेदरम्यान यावल खरेदी विक्री संघाचे सभापती राकेश फेगडे, व्हाइस चेअरमन अतुल भालेराव, माजी तालुका अध्यक्ष आणि खरेदी विक्री संघाचे संचालक उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस भरत पाटील, ज्ञानेश्वर तायडे, हेमराज उर्फ बाळू फेगडे, संचालक तेजस पाटील, प्रमोद नेमाडे, भाजप युवा मोर्चाचे भुषण फेगडे आणि नितीन महाजन यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावल शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड उत्साह असून, आगामी काही दिवसांत पक्षाच्या बैठकीनंतर अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या पाहता, पक्षांतर्गत स्पर्धा वाढणार असून, शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.


Protected Content

Play sound