Home क्राईम दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार व्यापारी जखमी

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार व्यापारी जखमी


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ झालेल्या आपघातात दुचाकीस्वार व्यापारी हे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली होती. याप्रकरणी बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर रघुनाथ पाटील वय ५२ रा. श्रीराम नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. किशोर पाटील हे मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता खासगी कामासाठी एमआयडीसीत दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएल ५९५) ने जात असतांना रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसोबत समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईएल ९३०५)ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात किशोर पाटील यांच्या हाताला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. रूग्णालयात उपचार घेल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश वंजारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound