Home क्राईम बसच्या भीषण अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

बसच्या भीषण अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात साराबाई गणेश भोई वय ४६ रा. पाडळसा ता. यावल या महिला प्रवाशाचा दुर्दैवी अंत झाला होता. याप्रकरणी बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता बसचालकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमळनेर आगाराची बस क्रमांक (एमएच-१४ बीटी-२३०६) ही जळगावकडून भुसावळकडे जात असताना बस नशिराबाद टोल नाक्याजवळ अचानक बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर भरधाव वेगात फुटले. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरकटलेली बस थेट टोल नाक्याजवळील एका भिंतीवर जाऊन आदळली.या अपघाताच्या धक्क्याने बसमध्ये साराबाई गणेश भोई या देखील बसमधून खिडकीतून बाहेर फेकल्या गेल्या. दुर्दैवाने, त्या बसच्या मागील चाकाखाली आली आणि चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी मयत महिलेचा मुलगा किरण गणेश भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक किशोर रामचंद्र जावळे रा. भुसावळ याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound