Home क्राईम दुदैवी घटना : भरधाव अज्ञात वाहनाने उडविले; तरूण जागीच ठार !

दुदैवी घटना : भरधाव अज्ञात वाहनाने उडविले; तरूण जागीच ठार !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथील रस्त्यावर पायी जात असलेल्या एका तरूणाला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुकेश अभिसिंग राठोड वय २१ रा. रामदेववाडी ता. जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी गावात मुकेश राठोड हा तरूण आपल्या आईवडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. बांधकाम बिगारीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मुकेश हा चायनिज दुकानावरून नास्ता करून घरी परत पायी जात असतांना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांला जोरदार धडक दिली.

या अपघातात मुकेश राठोड हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने आईवडीलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


Protected Content

Play sound