यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील भालोद गावातील ४६ वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी समोर आले आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश बाबुराव कोळी (वय ४६ रा. भालोद ता. यावल) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील भालोद गावात गणेश कोळी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. दरम्यान रविवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ते शेतात गेले असतांना ते काम करत असतांना अचानक पाण्यात पडले. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी घेवून विहिरीतून मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर यावल पोलीस फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय झाल्टे हे करीत आहे.




