
मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। जळगाव येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना आ. चंद्रकांत पाटील यांनी भुसावळ जवळील साकेगाव येथे माणुसकीचे दर्शन घडवले. साकेगावजवळ एका रिक्षाचा अपघात होऊन ती रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. रिक्षातील प्रवासी आकांत करत असताना, आ. चंद्रकांत पाटलांची एकमेव गाडी तेथे थांबली.

यावेळी आमदारांनी वेळ न गमावता स्वतः गाडीतून उतरून अपघातग्रस्त प्रवाशांना रिक्षातून बाहेर काढण्यास मदत केली. त्यांनी अपघातग्रस्त आणि घाबरलेल्या प्रवाशांना धीर दिला. तातडीने रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) बोलवून जखमींना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. सध्याच्या काळात लोकप्रतिनिधींमध्ये संवेदनशीलतेची कमतरता जाणवत असताना, एका विधानसभा सदस्याने स्वतः अपघातस्थळी धाव घेऊन केलेली ही मदत नक्कीच कौतुकास्पद आहे. आ. पाटील यांच्या या कृतीने त्यांच्यातील सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे.



