यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील थोरगव्हाण येथील उपसरपंच ज्योती केवल पाटील यांच्यावर आठ ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठरावास पारीत होण्यासाठी आवश्यक असलेली दोन तृतीयांश मते न पडल्याने अविश्वास ठराव अखेर बारगळा आहे. तहसिलदार जितेंद्र कुवर यांच्या अध्यक्षतेखाली थोरगव्हाण ग्रामपंचायत कार्यलयात अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन आज (दि.२०) सकाळी १०.०० वाजता करण्यात आले होते.
सभेला सकाळी १०.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सुरवात झाली असता उपसंरपच सौ. ज्योती पाटील यांच्यावर दाखल केलेल्या आठ ग्रामपंचायत सदस्यांपैकी फक्त एकच महिला सदस्या हजर होत्या तर सरपंच, उपसंरपचासह सात सदस्य गैरहजर असल्यामुळे दोन तृतियांश बहुमत न मिळाल्याने अविश्वास ठराव नाट्यमयरित्या बारगळा आहे.
आठ ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपचांवर लावलेले आरोप ठरले बिनबुडाचे ठरले आहेत. उपसरपंच सौ.ज्योती पाटील यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करतांना पुढीलप्रमाणे आरोप लावण्यात आले होते, त्या मनमानी अविचारीपणे शब्दांचा वापर करतात. तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळी काही कारण नसताना शिविगाळ करतात. या त्रासाला कंटाळुन उपसरपंचांवर यांच्यावर ग्राम पंचायत सदस्य हिरालाल शामराव पाटील, पद्दमाबाई विनोद पाटील, मनोहर कृष्णा पाटील, मथुरा जगदीश पाटील, सिंधूबाई राजेन्द्र पाटील, गोपाळ शालीक पाटील, अशोक गोबा भालेराव आणि यशोदाबाई अनिल भालेराव यांनी दि.१५ जुलै रोजी अविश्वास प्रस्ताव तहसीलदारांकडे दाखल केला होता. या बैठकीला साकळी मंडळ अधिकारी पी.ए.कडनोर, ग्रामसेवक कविता बाविस्कर, संगणक आँपरेटर सतीश पाटील यांनी सहकार्य केले.