Home क्राईम धरणगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

धरणगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
261

धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound