सावदा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज तालुका प्रतिनिधी : कॉंग्रेस पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या संघटनेला जिल्हा स्तरावर अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने एन.एस.यु.आयचे राष्ट्रीय सचिव अक्षय यादव (क्रांतिवीर), प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके व जिल्हा प्रभारी अॅड. कौस्तुभ पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्याचा प्रमुख हेतू म्हणजे, जळगावसारख्या एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात एन.एस.यु.आयचे संघटन पुन्हा मजबूत करणे व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे हा आहे. एन.एस.यु.आयचे पदाधिकारी जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमिटी कार्यालय, शाहू नगर येथे सकाळी ११ वाजता त्यांचे आगमन होणार आहे. ते विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसोबत ‘विद्यार्थी संवाद’ कार्यक्रमात सहभागी होतील. यानंतर दुपारी ४:३० वाजता अमळनेर शहरातील विद्यार्थी संवादात सत्रांमधून विद्यार्थ्यांच्या अडचणी, शैक्षणिक प्रश्न आणि युवक नेतृत्वावर मुक्त चर्चा होणार आहे. राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या दौऱ्याद्वारे उत्तर महाराष्ट्रात एन.एस.यु.आयचा विस्तार व नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.




