कल्याण (वृत्तसंस्था) कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील नीलम गेस्ट हाऊसमध्ये रात्री एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या लॉजच्या खोलीत एका तरुणाने गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर त्याच रूममध्ये एक तरुणी मृतावस्थेत आढळून आल्याचे समोर आले.
या संदर्भात अधिक असे की, कल्याण रेल्वे स्थानकासमोरील एका गेस्ट हाऊसमध्ये अरुण गुप्ता हा थांबलेला होता. अरुण मूळचा आझमगडचा असून गेस्ट हाऊसमधील रूम नंबर 204 मध्ये राहायला आला होता. तर काल संध्याकाळच्या सुमारास त्याच्याच खोलीत प्रतिभा प्रसाद ही 20 वर्षीय तरुणी राहायला आली होती. संध्याकाळी 9 वाजेच्या दरम्यान वेटरने जेवण देण्यासाठी त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला. मात्र बराच वेळ कुणीही प्रतिसाद न दिल्याने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता आत तरुणाचा गळफास घेतलेला तर तरुणीचा खाली पडलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला. दरम्यान, प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.