Home क्राईम बसस्थानकात बसमध्ये चढतांना वृध्द महिलेची सोन्याची पोत लंपास

बसस्थानकात बसमध्ये चढतांना वृध्द महिलेची सोन्याची पोत लंपास


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील बसस्थानकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बसमध्ये चढत असलेल्या ७० वर्षीय वृध्द महिलेच्या गळ्यातील सुमारे ६४ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

बेबाबाई आनंद वाघमारे (वय ७०, रा. गौतम नगर, धरणगाव) असे या पीडित महिलेचे नाव आहे. शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी ही घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धरणगाव बसस्थानकामध्ये घडली. बेबाबाई वाघमारे या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अलगदपणे लंपास केली. या पोतीची किंमत अंदाजे ६४,००० रुपये आहे.

काही वेळाने चोरी झाल्याचे लक्षात येताच वाघमारे यांनी बसस्थानकात आणि परिसरात सर्वत्र शोधाशोध केली, मात्र त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर, दुपारी २ वाजता त्यांनी थेट धरणगाव पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराची फिर्याद दिली. पीडित वृध्द महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण हे करीत आहेत.


Protected Content

Play sound