Home आरोग्य पहूर येथे उद्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन 

पहूर येथे उद्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन 

0
232


पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने पहूर शहरात ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता भव्य मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे हृदयविकारासंबंधी तपासणीची गरज असलेल्या नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार व सल्ला मिळणार आहे.

या शिबिराचे आयोजन पहूर शहर पत्रकार संघटना व हार्ट प्लस हॉस्पिटल, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, यासाठी पहूर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व पहूर मेडिकल असोसिएशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. शिबिराचे ठिकाण आई मल्टीस्पेशालिटी डे केअर सेंटर, डॉक्टर रवींद्र बडगुजर यांचा दवाखाना, जळगाव रोड, पहूर येथे निश्चित करण्यात आले आहे.

या शिबिरात हृदय रोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप अशोक भारुडे (एम.बी.बी.एस., एम.डी., डी.एन.बी. कार्डिओलॉजिस्ट – इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट) हे स्वतः उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत. शिबिरात लिपिड प्रोफाइल, बीपी तपासणी, पल्स रेट तपासणी, शुगर चाचणी आणि हृदयरोग विषयक सल्ला या सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत.

शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना हृदयरोगाच्या लक्षणांविषयी जागरूकता निर्माण होणार असून, वेळेवर निदान झाल्यास गंभीर परिस्थिती टाळता येऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.

स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या आरोग्यवर्धक उपक्रमांची गरज असून, या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound