Home Cities यावल स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्ताने रुग्णवाहिकेचे लोकार्पण!

स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्ताने रुग्णवाहिकेचे लोकार्पण!


यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व आमदार कृषीमित्र स्वर्गीय हरिभाऊ माधव जावळे यांच्या ७२ व्या जयंती निमित्ताने विविध उपक्रम घेण्यात आले. याअंतर्गत यावल येथे आमदार अमोल जावळे यांच्या स्थानिक विकास निधीतून गरजू रूग्णांच्या सेवेसाठी रूग्णवाहीका देण्यात आली. या रूग्णवाहीकेचे पुजन करून महिलांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले.

रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, माजी सभापती हर्षल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती राकेश फेगडे, उपसभापती दगडू उर्फ बबलु कोळी त्यांचे सर्व संचालक व महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे तुषार उर्फ मुन्ना पाटील, शिंदे गटाचे जिल्हा सहसंघटक नितिन सोनार यांच्यासह यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी निशिकांत गवई व भाजपाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी, माजी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्यासह आदी भाजपाचे पदधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


Protected Content

Play sound