Home क्राईम काळाचा घाला; धावत्या रेल्वेतून पडून तरूणाचा करूण अंत!

काळाचा घाला; धावत्या रेल्वेतून पडून तरूणाचा करूण अंत!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथून हातमजुरीचे काम संपवून जळगावला येत असलेल्या मोहसीन खान मन्सूरखान सिकलगर (वय ३७, रा. कासमवाडी) या तरुणाचा रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी २ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास माहेजी गावानजीक ही घटना घडली. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोहसीन खान हे गुरुवारी कामासाठी पाचोरा येथे गेले होते. तेथून ते रात्री रेल्वेने घरी परतत असताना माहेजी नजीक त्यांचा अपघात झाला. दुसऱ्या रेल्वेच्या चालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच स्थानक प्रमुखांना माहिती दिली. माहिती मिळताच रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांना मृत तरुणाच्या खिशात रेल्वेचे तिकीट, मोबाईल व चार्जर सापडले. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मोबाईलमधील शेवटच्या डायल केलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. तो क्रमांक पाचोरा येथील त्यांच्या कामाच्या ठिकाणच्या व्यक्तीचा निघाला. या व्यक्तीनेच पुढे मयताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. याबाबत जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound