Home Cities जळगाव डॉ. योगेश्वर नावंदर यांची ‘हायवे स्पेसिफिकेशन अँड स्टँडर्ड्स’ कमिटीवर निवड !

डॉ. योगेश्वर नावंदर यांची ‘हायवे स्पेसिफिकेशन अँड स्टँडर्ड्स’ कमिटीवर निवड !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक रोड येथील रहिवासी असलेले डॉ. योगेश्वर नावंदर यांची इंडियन रोड्स काँग्रेस (IRC) अंतर्गत कार्यरत असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘हायवे स्पेसिफिकेशन अँड स्टँडर्ड्स कमिटी’ (HSS) चे नियमित सदस्य म्हणून प्रतिष्ठेची निवड झाली आहे. या निवडीमुळे रस्ते आणि वाहतूक क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील धोरणांमध्ये नाशिकच्या तज्ज्ञांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

HSS ही रस्ते, वाहतूक, वाहतूक व्यवस्थापन आणि त्यांची देखभाल यासंबंधीच्या सर्व महत्त्वपूर्ण बाबींसाठी जबाबदार असलेली सर्वोच्च तांत्रिक समिती आहे. रस्त्यांशी संबंधित राष्ट्रीय धोरणे व मानके निश्चित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या समितीमार्फत केले जाते. यात रस्त्यांचे नियोजन, डिझाइन, बांधकाम, वाहतूक व्यवस्थापन आणि देखभाल यांसारख्या सर्व प्रमुख क्षेत्रांचा समावेश असतो.

डॉ. नावंदर आता ज्या समितीचे सदस्य बनले आहेत, ती HSS समिती IRC मधील दहा तांत्रिक समित्यांचे (H-1 ते H-10) मार्गदर्शन करते. या समित्या प्रामुख्याने वाहतूक नियोजन, लवचिक (Flexible) व कठोर (Rigid) फुटपाथ डिझाइन, तटबंदी व ड्रेनेज व्यवस्था, ग्रामीण रस्ते, रस्ते सुरक्षा, शहरी रस्ते आणि डोंगराळ रस्ते यांसारख्या विविध तांत्रिक क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन पुरवतात.

डॉ. योगेश्वर नावंदर यांच्या या प्रतिष्ठेच्या निवडीमुळे नाशिक शहराचा गौरव वाढला असून, राष्ट्रीय पातळीवर रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये त्यांचे अनुभव व ज्ञान निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound