मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल जवळ शिक्षणाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ३५ हजार रुपयांची रोकड असा १ लाख १५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात रविवारी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परेश मधुकर चौधरी वय-४३, रा. शिव कॉलनी, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल जवळ, मुक्ताईनगर हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून खडसे आश्रम शाळेत ते शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. दरम्यान २७ ते २८ सप्टेंबर दरम्यान त्यांचे घर बंद होते. या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे हॉलचे खिडकीची लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि 35 हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर परेश चौधरी यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे हे करीत आहे.




