पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या होणाऱ्या “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने पारोळा शहरात त्यांच्या जीवनावर आधारित “चलो जीते है” या प्रेरणादायी लघुपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. एलईडी व्हॅनद्वारे दाखवण्यात आलेला हा चित्रपट शहरवासीयांसाठी एक सकारात्मक अनुभव ठरला. जनतेच्या मनात राष्ट्रसेवेसाठी समर्पित जीवन जगणाऱ्या नेतृत्त्वाबद्दल अधिक आत्मीयता निर्माण करणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचे उद्घाटन 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता शिवतीर्थ, पारोळा येथे पार पडले. उद्घाटन सोहळ्याला विविध भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “चलो जीते है” या चित्रपटाचे विशेषत्व म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या बालपणातील संघर्षमय कथा, त्यांच्या सामाजिक जाणिवा आणि लहान वयातच देशासाठी काही तरी करण्याची लागलेली धून – या गोष्टी प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत.

हा संपूर्ण उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन, खासदार सौ. स्मिताताई वाघ, राज्य सेवा पंधरवड्याचे सह-समन्वयक आमदार मंगेश चव्हाण, तसेच जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्यामजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. चित्रपट प्रदर्शनासाठी एलईडी व्हॅन उपलब्ध करून देणारे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश तांबे यांनी या उपक्रमासाठी विशेष पाठबळ दिले.
उद्घाटन सोहळ्याला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेन्द्रभाऊ बोहरा, जिल्हा चिटणीस रविंद्रजी पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोहन दादा मोरे, तालुकाध्यक्ष अतुलअण्णा पवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य धीरज जी महाजन, शहराध्यक्ष मुकुंदजी चौधरी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. पारोळा शहरात विविध ठिकाणी ही एलईडी व्हॅन फिरवून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पंतप्रधान मोदींचे कार्य आणि जीवनदृष्टी पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारा “चलो जीते है” हा चित्रपट विशेषतः तरुणांमध्ये राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा निर्माण करणारा ठरत आहे. समाजहितासाठी स्वप्न बघणाऱ्या आणि त्यासाठी झटणाऱ्या नेतृत्वाची कथा जनतेपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम म्हणून या प्रदर्शनाचं विशेष महत्त्व आहे. एलईडी व्हॅनद्वारे केलेली ही अभिनव मांडणी पारोळ्याच्या जनतेच्या पसंतीस उतरली आहे.



