Home क्राईम डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी; १० हजाराची रोकड लांबविली

डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी; १० हजाराची रोकड लांबविली

0
173

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तुकाराम वाडी परिसरात असलेल्या एका डॉक्टरच्या क्लिनिकचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी १० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. प्रमोद भागचंद खिवसरा (वय ५८, रा. प्रताप नगर) यांचे तुकाराम वाडी परिसरात ‘खिवसरा क्लिनिक’ नावाचे दवाखाना आहे. १५ ते १६ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी क्लिनिकचा दरवाजा दुसऱ्या (मास्टर) चावीचा वापर करून उघडला. आत प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी क्लिनिकमधील लाकडी ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले १० हजार रुपयांचे रोख पैसे चोरून नेले.

चोरी झाल्याचे लक्षात येताच डॉ. खिवसरा यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि चौकशी सुरू केली. प्राथमिक चौकशीनंतर, अखेर बुधवारी रात्री ८.३० वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम वाडीसारख्या वस्तीत डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गिरीश पाटील हे करीत आहेत.


Protected Content

Play sound