Home क्राईम धावत्या रेल्वेच्या धक्क्याने प्रौढ जागीच ठार !

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने प्रौढ जागीच ठार !

0
197

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील असोदा रेल्वेउड्डाण पुलाच्या खाली धावत्या रेल्वेखाली अनोळखी प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दरम्यान मयत हे वाल्मीक नगर मधील रहिवासी असल्याचे बुधवारी 24 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता निष्पन्न झाले. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ज्ञानेश्वर सुदाम पाटील (वय-५५, रा. वाल्मीक नगर, जळगाव) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहितीनुसार, ज्ञानेश्वर पाटील हे वाल्मीक नगरात आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. रिक्षा आणि खाजगी कंपनीत काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान सोमवारी रात्री ते घरात कोणाला काही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला होता. यावेळी शनिपेठ पोलिसांनी धाव घेऊन सुरुवातीला अनोळखी म्हणून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता मयत हे ज्ञानेश्वर पाटील असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली आणि ओळख पटवली. दरम्यान सकाळी ११ वाजता सेवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound