धरणगाव प्रतिनिधी । सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरात काल झालेल्या जन आशीर्वाद सभेत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जळगाव ग्रामीण मधून निवडणूक लढावी, असा आग्रह धरला होता. यावरुन आता संभाजी ब्रिगेडने ना. पाटील यांच्यावर उपरोधात्मक टिका करत, तुम्ही निवडणूक लढू इच्छित नसाल तर किमान शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना उमेदवारी द्यावी, असा सल्ला सोशल मिडीयाच्या माध्यामातून दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना विधानसभेची उमेदवारी देऊन नवीन संधी देण्यास काही हरकत नाही. कारण ते सुमारे चाळीस वर्षापासून निष्ठेने शिवसेनेचे वाढीचे काम गुलाबराव वाघ करीत आहेत. गुलाबराव वाघ यांच्या निमित्ताने धरणगाव शहराला व माळी समाजाला सुद्धा यानिमित्ताने संधी मिळेल. गुलाबराव वाघ यांच्यामुळे सर्व धरणगाव शहर सुद्धा एकत्र येईल. नामदार गुलाबराव पाटील हे इच्छा असल्यास स्वतः एम.एल.सी सुद्धा होऊ शकतात. गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पद सुद्धा सुमारे दोन वेळा सांभाळून त्यांना कोणतीही संधी मिळालेली दिसत नाही. गुलाबराव पाटलांच्या प्रत्येक विजयात सिंहाचा वाटा गुलाबराव वाघ यांचा आहे. हे सत्यता कोणीही नाकारु शकत नाही. गुलाबराव पाटील यांना सुद्धा हे मान्य करावेच लागेल की, काल एवढी मोठी सभा झाली, पण गुलाबराव वाघ यांच्या कार्याचा व त्यांच्या नावाचा साधा नामोल्लेख कुठल्याही बड्या नेत्याने केलेला नाही. याची सुद्धा धरणगावकरांनी खंत व्यक्त केली आहे. सोशल मीडियात हा संदेश संभाजी बिग्रेडचे गोपाल पाटील यांनी व्हायरल केला आहे.