Home Cities जळगाव नवदुर्गा मित्र मंडळाची नवीन कार्यकारिणी घोषित ; अध्यक्षपदी गिरीश भोळे, तर उपाध्यक्षपदी...

नवदुर्गा मित्र मंडळाची नवीन कार्यकारिणी घोषित ; अध्यक्षपदी गिरीश भोळे, तर उपाध्यक्षपदी हितेश जावळे यांची निवड

0
430


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री हरी मंदिर प्रतिष्ठान संचालित नवदुर्गा मित्र मंडळातर्फे यंदाचा नवरात्रोत्सव भव्य आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार असून, विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या आयोजनाने मंडळाने पुन्हा एकदा भाविकांचे लक्ष वेधले आहे. यंदा मंडळातर्फे बुऱ्हाणपूर येथून आणलेली आकर्षक, पर्यावरणपूरक माता अन्नपूर्णा देवीची मातीची मूर्ती मंडळाच्या मुख्य स्थळी प्रतिष्ठापित केली जाणार आहे.

या वर्षीच्या नवरात्रोत्सवासाठी नवदुर्गा मित्र मंडळाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. अध्यक्षपदी गिरीश कैलास भोळे, तर उपाध्यक्षपदी हितेश जावळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यकारिणीने उत्सवाचे अत्यंत उत्तम नियोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळातर्फे भव्य दांडिया रासचे आयोजन करण्यात आले असून, यंदा ‘मेलोडी सुपरहिट ऑर्केस्ट्रा’ तर्फे गुजरातहून विशेष गायक आणि वादक पथक जळगावमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे दांडियाचा उत्साह प्रचंड असून, संध्याकाळी ७ ते १० या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर स्पर्धक आणि प्रेक्षक सहभागी होणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना मंडळातर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

याशिवाय दररोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता देवीची महापूजा व आरती मान्यवरांच्या हस्ते केली जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत मंडळातर्फे सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच, दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाणार असून, हा कार्यक्रम भाविकांसाठी एक आनंदाचा सोहळा ठरणार आहे.

मंडळाच्या नियोजनात संस्थापक अध्यक्ष कैलास भोळे यांच्यासह सचिव सुरज चौधरी, संघटक रितेश पाटील, खजिनदार जयंत राणे, नियोजन समितीतील उषाताई बेहरे व ज्योतीताई पाटील आणि सल्लागार समितीतील शैलेंद्र पाटील, मुकेश महाजन, शेखर चौधरी आदी पदाधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग आहे. सदस्य म्हणून कुशल महाजन, तेजस राजपूत, शुभम पाटील यांसह अनेक तरुण कार्यकर्ते संयोजनात सहभागी आहेत.


Protected Content

Play sound