Home क्राईम ब्रेकिंग न्यूज : बेपत्ता तरुणाचा मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने खळबळ!

ब्रेकिंग न्यूज : बेपत्ता तरुणाचा मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने खळबळ!

0
256

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगावमधील बिलाल चौकातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद मेहरूण तलावात शनिवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय अबूझर शेख युनूस गेल्या दोन दिवसांपासून बिलाल चौकातून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, शनिवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मेहरून तलाव येथे जय सपकाळे यांनी अबूझरचा मृतदेह तरंगताना दिसून आला. जय सपकाळे यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि रवी हटकर यांनी मृतदेह तलावातून बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी जिल्हा सरकारी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी मृतदेह पाहून त्यांनी मोठ्या प्रमाणावर आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले आणि अबूझर शेखला काहीतरी झाले असल्याचा संशय व्यक्त केला. मेहरुण तलावात बुडणे सहसा एका दिवसात घडत असल्याने, यावेळी अबूझरचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. त्यांना न्याय मिळवून द्या, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound