Home क्राईम वृध्दाच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या लांबविल्या

वृध्दाच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या लांबविल्या

0
133

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा रोड परिसरात राहणाऱ्या एका वृध्दाच्या ६० हजार रूपये किंमतीच्या दोन अंगठ्या चोरून नेल्याची घटना सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आली आहे. याबाबत मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चुन्नीलाल दौलत पाटील वय ६८ हे आपल्या कुटुंबियांसह पिंप्राळा रोड परिसरात वास्तव्याला आहेत. सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ उभे असतांना त्यांच्याजवळ दोन अनोळखी व्यक्ती आले. दोघांनी चुन्नीलाल पाटील यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळील ६० हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. हा प्रकार घडल्यानंतर पाटील यांनी दुसऱ्या दिवशी मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी रामानंद नगर नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound